Ad will apear here
Next
अनिल शिरोळे यांना ‘एथिकल पॉलिटीशियन’ पुरस्कार
खासदार अनिल शिरोळेपुणे : ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीने पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांचा ‘द पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी-एथिकल पॉलिटीशियन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. मुंबई येथील रॉयल मुंबई यॉट क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात माहिती आयुक्त व माजी मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. काही अपरिहार्य स्वत: अनिल शिरोळे हे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याऐवजी सत्यजित थोरात यांनी हा पुरस्कार स्वीकारला.         

इंडो मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेने वीस वर्षे पूर्ण केल्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या वतीने अनिल शिरोळे यांचा गौरव करण्यात आला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZHRBX
Similar Posts
नव्या रूपातील प्रगती एक्स्प्रेस प्रवाशांच्या भेटीला पुणे : मुंबई-पुणेदरम्यान दररोज प्रवास करणारी प्रगती एक्स्प्रेस आता नव्या रूपात प्रवाशांच्या भेटीला आली आहे. चार नोव्हेंबर २०१८ रोजी पुणे स्थानकात या गाडीला खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवून नव्या रूपातील पहिल्या प्रवासाला सुरुवात करण्यात आली.
स्मार्ट सिटीत आता ‘स्मार्ट बसथांबे’ पुणे : स्थानिक पातळीवरील दळणवळणात अंतर्गत बस वाहतूक महत्त्वाचा भाग आहे. ही वाहतूक कार्यक्षम करीत असताना स्मार्ट सिटीतील बसथांबेदेखील ‘स्मार्ट’ आणि नागरिकांच्या सोयीचे असावेत या विचारातून पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीमधून शहरात विविध ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे बसथांबे उभारण्यात येणार आहेत
आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना आरक्षणाचा निर्णय स्वागतार्ह पुणे : ‘उच्च जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी नोकऱ्या व शिक्षणसंस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आणि न्यायाला धरून आहे. मी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो’, अशी प्रतिक्रिया खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केली.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी मुंबई : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. यासाठी पुणे शहरातील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language